Luyesh Hadal हा एक सुपर हिट YouTube कलाकार, संगीतकार आणि डान्सर आहे. त्याने आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्यामुळे अल्पावधीतच सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवली. “खाटी खाटी ताडी“ या गाजलेल्या YouTube म्युझिक व्हिडिओद्वारे त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, ज्यामुळे त्याला ओळख आणि लोकांची पसंती मिळाली.

लुयेश हडळ यांचे पूर्ण नाव लुयेश रुपाजी हडळ आहे. त्याचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण डोंगरी आश्रम शाळा येथे झाले. यानंतर त्यांनी तलासरी येथे पुढील शिक्षण पूर्ण केले. त्याला लहानपणापासूनच संगीत, नृत्य आणि अभिनय यामध्ये विशेष रुची होती, आणि हीच आवड पुढे त्याच्या यशस्वी YouTube प्रवासाला कारणीभूत ठरली.
आज लुयेश हडळ हा आदिवासी युवा कलाकारांचा आदर्श ठरत आहे. त्याच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये स्थानिक भाषेचा, संस्कृतीचा आणि संगीताचा सुंदर संगम पाहायला मिळतो, ज्यामुळे तो गावठी आणि पारंपरिक रसिकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.